खांबाळे बौद्ध विकास मंडळ मुंबई अध्यक्ष पदी प्रदीप कांबळे

कार्याध्यक्ष पदी अरुण कांबळे,तर सरचिटणीस पदी संतोष कांबळे यांची बहुमताने निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे बौद्ध विकास मंडळ मुंबई शाखेची सर्वसाधारण सभा पाच गार्डन माटुंगा (पुर्व) मुंबई येथे नुकतीच संपन्न झाली या सभेत सन 2025 ते 2030 पंचवार्षिक सालाकरिता सर्वानुमते नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष-प्रदीप कांबळे,उपाध्यक्ष-गौतम कांबळे,कार्याध्यक्ष-अरुण कांबळे,सरचिटणीस- संतोष कांबळे,सहसचिव- तुषार कांबळे,राहुल कांबळे, कोषाध्यक्ष-रोहन कांबळे,हिशेब तपासणीस-विशाल कांबळे,संतोष कांबळे,संदेश वाहक-तेजस कांबळे,अभिषेक कांबळे, कार्यकारिणी सदस्य-बाळकृष्ण कांबळे,हेमंत कांबळे,संदेश कांबळे,प्रबोध कांबळे,सुर्यकांत कांबळे,प्रभाकर कांबळे,रघुनाथ कांबळे,सल्लागार पदी-कृष्णा कांबळे,सुनील कांबळे,हरिश्चंद्र जाधव,महेंद्र खांबाळेकर अशी कार्यकारिणी निवडण्यात आली.

अध्यक्ष प्रदीप कांबळे हे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.855 चे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.तसेच बौद्धजन पंचायत समिती सभापती आनंदराज आंबेडकर यांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांच्या अनुभवाचा खांबाळेकर भावकीला लाभ होणार आहे. कार्याध्यक्ष अरुण कांबळे व सरचिटणीस संतोष कांबळे यांनी तरुण बचत ग्रामीण पातळीवर काम करत असताना काही वर्षे सामाजिक आणि धार्मिक चळवळीत सक्रीय कार्यकर्ते म्हणून काम केलेले आहे. त्यांच्या या अनुभवामुळेच मुंबई शाखेने सर्वानुमते त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. या सभेला बहुसंख्येने सभासद उपस्थित होते.

या सभेची सांगता सभाध्यक्ष कृष्णा कांबळे यांनी केली. आणि आभार माजी सरचिटणीस महेंद्र खांबाळेकर यांनी मानले.

error: Content is protected !!