वैभववाडीत विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

विश्वकर्मा सुतार पांचाळ समाजाच्या वतीने अनेक मान्यवरांचा करण्यात आला सत्कार

वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री विराट विश्वकर्मा सुतार पांचाळ समाज मंडळ वैभववाडीच्या वतीने श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सकाळी प्रतिमापूजन, पूजा, आरती तसेच दुपारी शासनाच्या विविध योजना विषयी मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. दुपारी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ पार पडला तसेच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचल सुरू होती. या निमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दर्शनासाठी वैभववाडीतील भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रताप सुतार, उपाध्यक्ष डि.के. सुतार, सचिव बाबाजी उर्फ बाळा पांचाळ, माजी सभापती दीपक सुतार, माजी उपसभापती शोभा पांचाळ, उत्तम सुतार, संतोष पांचाळ, गणपत सुतार, प्रभाकर पांचाळ, सुरेश सुतार, सूर्यकांत सुतार, नंदकुमार पांचाळ, मोहन सुतार, सुरेश सुतार, हर्षदा सुतार, उमा सुतार, जयवंत सुतार, बाळा सुतार, नीलम पांचाळ, वासुदेव सुतार, रमेश पांचाळ, प्रकाश सुतार, सदाशिव सुतार, संदीप सुतार, योगेश सुतार, आप्पा सुतार, आनंद सुतार, गजानन सुतार, सत्यवान सुतार व सुतार बांधव, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समाज बांधवांच्या वतीने माजी सभापती दीपक सुतार, डि.के. सुतार, शोभा पांचाळ, सुरेश सुतार, भिकाजी सुतार, प्रकाश सुतार, नंदू पांचाळ, रमेश पांचाळ, सत्यवान सुतार, सुरेंद्र रावराणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हळदीकुंकू व इतर कार्यक्रम पार पडले. हळदीकुंकू समारंभास महिलांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव बाबाजी उर्फ बाळा सुतार यांनी केले.

error: Content is protected !!