करूळ मध्ये एसटी मोटरसायकल मध्ये अपघात ; एक गंभीर जखमी

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील करूळ खडकवाडी येथे एसटी बस व मोटार सायकल यांच्यात झालेल्या धडकेत मोटार सायकलस्वार विश्वनाथ (बबन) सावंत वय 56 वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना वैभववाडी येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी ओरस येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडला.

सावंत आपल्या मोटर सायकलने गावातच जात असताना खडकवाडी फाटा येथे एसटी बस व त्यांची मोटार सायकल यांच्यात धडक झाली. मोटर सायकल बस च्या खाली गेली तर सावंत यांचे डोके बसवर आपटल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांच्यावर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हळविण्यात आले आहे.

error: Content is protected !!