उपनगराध्यक्ष गटनेता नगरसेवक भाजपात

सिंधुदुर्गात भाजपाचा ठाकरे सेनेसह काँग्रेसला मोठा धक्का

ओरोस (प्रतिनिधी) : भाजप पक्षाने बुधवारी ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. ओरोस येथे आयोजित कुडाळ तालुका भाजपा मेळाव्यात कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे सर्व नगरसेवक, काँग्रेसच्या दोन्ही नगरसेविका तसेच देवगड जामसंडे नगर पंचायतीचे ठाकरे शिवसेनेचे गटनेते बुवा तारी, नगरसेवक संतोष तारी यांच्यासह ६०० ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले.

कुडाळ तालुका भाजप पक्षाचा कार्यकर्ता मेळावा बुधवारी सायंकाळी ओरोस सावंतवाडा येथील भवानी मंदिर नजीकच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, ऍड अजित गोगटे, अशोक सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, राजू राऊळ, महेश सारंग, संध्या तेरसे, कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, महिला अध्यक्षा आरती पाटील, ओरोस मंडळ अध्यक्ष सुप्रिया वालावलकर, रुपेश कानडे, पप्या टवटे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी झालेल्या पक्ष प्रवेशावेळी ठाकरे शिवसेनेच्या कुडाळ तालुक्यातील असंख्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भाजपचे कमळ हातात घेतले. यामध्ये कुडाळ नगर पंचायतचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आफरिन करोल, अक्षता खटावकर, ठाकरे शिवसेनेचे विद्यमान उपनगराध्यक्ष किरण शिंदे,
नगरसेवक उदय मांजरेकर, ज्योती जळवी, सई काळप, श्रेया गवंडे यांचा समावेश आहे. याच बरोबर कुडाळ पंचायत समितीच्या माजी सभापती शिल्पा घुर्ये, आंब्रड जिल्हा परिषद मतदार संघाच्या माजी सदस्य कल्पिता मुंज, आबा मुंज या सगळ्या ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

ओरोसमध्ये सुद्धा ठाकरे शिवसेनेला धक्का
यावेळी ओरोस गावातील ठाकरे शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये युवा कार्यकर्ते छोटू पारकर, उदय जांभवडेकर, सुनील जाधव, ग्राम पंचायत सदस्य योगेश तावडे, अमित भोगले यांच्यासह सुशील निब्रे, संजय परब, दिनेश जैतापकर यांचा यात समावेश आहे. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. कुसबे पोखरण गावातील ठाकरे शिवसैनिकांनी भाजपमध्ये यावेळी प्रवेश केला.

error: Content is protected !!