फोंडा घाट येथे तृणधान्य आधारित पाककृती स्पर्धा संपन्न !
फोंडाबोकल भाटले शाळेच्या स्वरा वरक प्रथम ! नवी कुर्ली वसाहत शाळेच्या चेतना खेडेकर द्वितीय ! सुतारवाडी शाळेच्या ज्योत्स्ना लाड तृतीय !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये सर्व शाळांमधून मोठ्या प्रमाणात शाळा व्यवस्थापन समिती, पालक,विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहकार्याने कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्यासाठी तृणधान्य आधारित पाककृती स्पर्धांचा आयोजन केले जात… याचाच एक भाग म्हणून फोडाघाट केंद्रस्तरीय पाककला स्पर्धा नुकत्याच केंद्र शाळा फोडा नंबर एक या शाळेमध्ये संपन्न झाल्या.. त्यावेळी फोंडाघाट मधील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. पाताडे बोलत होते…. व्यासपीठावर सौ पूजा सावंत पटेल सौ सुश्मिता राऊळ संजय सावंत, श्रीमती दर्शना ठाकूर,रेणुका जोशी, साधना कांबळे, राजेंद्र गोसावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदर स्पर्धेमध्ये फोंडा बोकल भाटले शाळेच्या स्वयंपाकी स्वरा वरक यांनी प्रथम क्रमांक मिळविला. नवीन कुर्ली वसाहत शाळेच्या सौ.चेतना खेडेकर यांनी द्वितीय तर फोंडा सुतारवाडी शाळेच्या सौ.जोत्स्ना लाड यांनी तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धेमध्ये एकूण आठ शाळांच्या स्वयंपाकी यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉक्टर भूषण पाताडे श्रीमती पूजा सावंत पटेल व श्रीमती सुष्मिता राउळ मॅडम यांनी महत्त्वाचे भूमिका निभावली. संपूर्ण स्पर्धेच सूत्रसंचालन दिलीप शेळके यांनी केले.यातील प्रथम क्रमांक प्राप्त पाककला कृतीची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.












