चिंदर येथे आज डबलबारी भजनाचा सामना….!

श्री देव रामेश्वराच्या वर्धापन दिन सोहळयाचे औचित्य….!

बुवा संदीप पुजारे विरुद्ध बुवा संदिप लोके यांच्यात रंगणार डबलबारी भजनाचा सामना

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वरचा १३ वा वर्धापन दिन सोहळा आज शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी साजरा होत आहे. त्यानिमित्त रात्रौ ९.३० वाजता डबलबारी सामना आयोजित केला आहे. महादेश्वर प्रसादिक भजन मंडळचे बुवा संदीप पुजारे, पखवाज साथ संकेत राऊत, तबला साथ कौस्तुभ घाडी विरुद्ध श्री वडची देवी प्रासादिक भजन मंडळ लिंगडाळ, बुवा संदिप लोके यांना पखवाज साथ योगेश सामंत तर तबला साथ संदेश सुतार करणार आहे. तरी भाविक डबलबारी भजनाचा आनंद घ्या असे आवाहन श्री देव रामेश्वर ट्रस्ट चिंदर यांनी केले आहे.

error: Content is protected !!