मंगेश लोके मित्र मंडळ खंबाळे व शिवप्रेमी मित्र मंडळ खंबाळे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सवाचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : मंगेश लोके मित्र मंडळ खंबाळे व शिवप्रेमी मित्र मंडळ खंबाळे वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बुधवारी दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी व गुरुवार दिनांक २० फेब्रुवारी २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता शिवप्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन, लोरे नं. २ शिवाजी महाराज पुतळा ते वैभववाडी संभाजी चौक पर्यंत ९.३० वाजता शिवप्रेमी भव्य मोटरसायकल व रिक्षा रॅली, सायंकाळी ३.४५ वाजता संजय वासुदेव पवार यांच्या सौजन्याने महिलांसाठी हळदीकुंकवाचा समारंभ तसेच सायंकाळी ४ वाजता मुली व महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

गुरुवारी 20 फेब्रुवारी रोजी रात्री ठीक ९ वाजता रणमर्द मराठ्यांच्या शिवकालीन युद्ध कलेचा धगधगता इतिहास सोबत मावळा शाहीर मिलिंद सावंत ऐतिहासिक पोवाडे शिव संस्कारित समाजप्रबोधन पर भारदार निवेदन कोल्हापूर भूषण वस्ताद आनंदराव शंकर ठोंबरे व मर्दानी खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवप्रेमी महिलांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले आहे. तरी खांबाळे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व शिवप्रेमी यांनी कांबळे केंद्र शाळा पटांगणावर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही मंडळातर्फे विनंती करण्यात आली आहे.

error: Content is protected !!