बस स्थानक रेल्वे स्टेशन वर दागिने चोरीतील आरोपी जेरबंद
कणकवली (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसापासून कणकवली शहरांमध्ये काही अज्ञात आरोपीत यांनी एसटी बस व रेल्वेमध्ये चढणाऱ्या वयोवृद्ध महिलांचे हातातील सोन्याच्या बांगड्या गर्दीचा फायदा घेऊन कट करून चोरून नेलेल्या होत्या. सदर गुन्ह्यांचा कणकवली पोलीस ठाणे व LCB सिंधुदुर्ग यांचेकडून समांतर तपास सुरू असताना गुन्हाचे घटनास्थळी मिळालेले CCTV फुटेजच्या आधारे काही संशयित आरोपीत इसमांचा गुन्ह्याचे घटनेमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न होऊन आरोपी हा वांद्रापाडा, अंबरनाथ (पश्चिम), जिल्हा ठाणे येथे वास्तव्यास असलेबाबत गोपनीय माहिती मिळालेली होती.
त्या माहितीच्या आधारे दी. 18.02.2025 व दि. 19.02.2025 रोजी अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीत वांद्रापाडा या ठिकाणी कणकवली पोलीस ठाणे व LCB सिंधुदुर्ग यांनी संयुक्तपणे अविरत शोध मोहीम राबवून गुन्ह्यातील एक आरोपी प्रीतम देवदास गायकवाड, वय -35 वर्षे यास ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणलेले आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या इतर साथींदारासह सदरचे गुन्हे केले असल्याचे सांगितलेले आहे.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक, सौरभ अग्रवाल,एडिशनल एसपी ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ (कणकवली पो. ठाणे), श्रेणी पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके, सपोफौ/ 316 कोयंडे, पोहवा/731 देसाई (LCB सिंधुदुर्ग) यांच्या पथकाने केली आहे.












