पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बाळशास्त्री जांभेकर यांची पोंभुर्ले येथे जयंती साजरी

देवगड (प्रतिनिधी) : वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती त्यांच्या मूळ गावी, पोंभुर्ले येथे साजरी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे आणि उपस्थित राहून त्यांना अभिवादन केले. “वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले या गावी संपूर्ण देशाला आदर्श ठरेल असे स्मारक उभे करू, जेणेकरून त्यांनी त्यांच्या लहान वयातच केलेल्या कामाचा परिचय होऊ शकेल. यासाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी पुढाकार घ्यावा.” असे मत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार अजित गोगटे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, तहसीलदार आर. जे. पवार, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर, देवगड तालुका पत्रकार समितीचे तालुकाध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, गावच्या सरपंच प्रियांका धावडे, उपसरपंच सादिक डोंगरकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम व अनेक पत्रकार, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!