उन्हाळ्यात वृक्षलागवड करून पिडब्ल्यूडी कडून भ्रष्टाचार

कणकवली (प्रतिनिधी) : पिडब्ल्यूडी कडून जिल्ह्यात 10 हजार झाडे लावण्याची घोषणा केली. तत्कालीन पालकमंत्र्यांनी सांगितल्यानुसार राजमुद्रा या नर्सरी मधून रोपे विकत घेतली.वृक्षलागवड करून पर्यावरणसंवर्धन करणार असे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी मे महिन्यात सांगितले होते. ही झाडे किमान जुलै महिन्यात लागवड होणे गरजेचे होते. मात्र आता टेंडर मंजूर झाल्यानंतर ऐन उन्हाळ्यात वृक्षारोपण पिडब्ल्यूडी कडून केले जात आहे. ह्या वृक्षांची देखभाल संबंधित ठेकदारकडून करण्यात येणार असल्याचे पिडब्ल्यूडी कडून सांगण्यात येत आहे. सध्या उन्हाळ्यात लावण्यात येणारी झाडे ही राजमुद्रा नर्सरी तील आहेत की अन्य कोणत्या नर्सरीतील आहेत हे सवाल आहे. ऐन उन्हाळ्यात लावलेली ही झाडे आता उन्हामुळे मरताहेत. त्यामुळे झाडेच जाग्यावर नसतील तर देखभाल कशाची करणार ? असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. पिडब्ल्यूडी चे अधिकारी यात भ्रष्टाचार करत आहेत. आणि याकडे पालकमंत्री नितेश राणे दुर्लक्ष करत आहेत. या अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांचा वचक नसल्याचे सांगत या ठेकेदाराला पुन्हा वृक्षारोपण करण्यासाठी शिवसेना उबाठा भाग पाडेल असेही उपरकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!