व्ही.एन. नाबरच्या पालक शिक्षक संघाची पहिली सभा संपन्न

बांदा (प्रतिनिधी) : बांदा पंचक्रोशीत वसलेल्या व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सभागृहात चालू वर्षाची पालक शिक्षक सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. आजच्या पालक सभेची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर आजच्या पालक सभेचे अध्यक्ष भाऊ वाळके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यंदाच्या दहावीच्या परीक्षेत पहिल्या पाच क्रमांक मध्ये आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रशालेतील इयत्ता आठवी मधील अन्वयी आशिष पवार या विद्यार्थिनी चा सकाळ माध्यम समूह तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच डूडल डेअर बी चित्रकला ऑलिंम्पियाड स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर पाचवा व राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या नर्सरी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला गेला.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या आठवीतील विद्यार्थी कु. आराध्य रामचंद्र तेली या विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे त्याचा ही यावेळी सत्कार करण्यात आला. या यशस्वी विद्यार्थ्यांचे व्यासपिठावरील सर्व मान्यवरांनी कौतुक केले. त्यानंतर शाळेतील एम. एस. ए. टी विभागाचे निदेशक भुषण सावंत यांनी या एम. एस. ए. टी अंतर्गत येणार्‍या अभ्यासक्रमाची माहिती पालकांनी दिली. तसेच या अभ्यासक्रमातील विषय भविष्यात विद्यार्थी वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण करताना खूप उपयोगी पडतील असे देखील सांगितले.

प्रशालेचे सहाय्यक शिक्षक हर्षद खडपकर यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत घेण्यात येणार्‍या इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना असलेल्या इंटरमिजिएट अँड एलिमेंटरी कला परीक्षेची माहिती दिली. सभेचे औचित्य साधून शिक्षक पालक संघासाठी नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालकांपैकी एक पालक प्रतिनिधी निवडण्यात आला. त्याचप्रमाणे या संघात काम करण्यास इच्छुक असणार्‍या पालकांना देखील संघात समाविष्ट करण्यात आले. शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षपदी सुनील दिवाकर नाटेकर यांची निवड करून पालक शिक्षक संघाची स्थापना झाली. गजानन गायतोंडे, नितीन सावंत, घनश्याम सावंत, प्रियांका गवस हे ह्यावर्षी निमंत्रक सदस्य म्हणुन काम पाहतील. यावेळी भाऊ वाळके, सुधाकर डेगवेकर, भिकाजी धुरी, गजानन गायतोंडे, सुरेश गावडे यांनी आपले विचार मांडताना शाळेचे भरभरून कौतुक केले. तसेच शाळेच्या प्रगतीसाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या. १९ वर्षांची १००% निकालाची परंपरा पुढेही अशीच चालू राहण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. शाळेच्या प्रगतीसाठी पालकांनीही सहकार्य करावे असे आवाहन केले.

शाळेत दाखल झालेल्या प्रत्येक मुलाचे भविष्य कसे उज्वल होईल व तो विद्यार्थी यशाची शिखरे पादाक्रांत करताना येणाऱ्या अडचणीवर मात करून कसा पुढे जाईल याच विचारात असणारे नर्सरी ते दहावीपर्यंतच्या अनुभवी व उच्चशिक्षित शिक्षकांची कौतुकाने पाठ थोपटली . त्याचबरोबर स्कूल कमिटी व गव्हर्निंग कांऊनसिलच्या सदस्यांपैकी , सुरेश गावडे, सुरेश गोवेकर, राजेश गोवेकर, भिकाजी धुरी, शशी पित्रे, सुधाकर डेगवेकर तसेच शाळेचे हितचिंतक नितिन सावंत आदि उपस्थित होते.

सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी केले, सुत्रसंचालन शिक्षिका स्नेहा नाईक तर आभार शिक्षिका शिल्पा कोरगावकर यांनी मानले व पालक प्रतिनिधी निवडताना रसिका वाटवे यांनी सूत्रे सांभाळली. सुप्रिया पाटील, प्रतीक्षा शिरोडकर यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी शाळेचे इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वानुमते सभा संपवण्यात आली.

error: Content is protected !!