आचरा (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात अन्नसुरक्षा प्रशिक्षण पुर्ण करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा ठरणार आहे. याचे सर्व श्रेय अन्न प्रशासन अधिकारी, महासंघ, तालुका, ग्रामीण व्यापारी संघटनांच्या प्रयत्नांना जाते. बदलत्या धोरणानुसार आपणास स्पर्धेत टिकण्यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या नियमांची काटेकोर पालन करुन व्यवसाय केल्यास आपण स्पर्धेत टिकू शकतो असे मत सिंधुदुर्ग जिल्हा महासंघाचे सचिव राजू जठार यांनी आचरा येथे व्यक्त केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व व्यापा-यांनी महासंघाचे सभासद होण्याचे आवाहन केले.
आदर्श व्यापारी संघटना आचरा तर्फे अन्न व्यावसायाशी संबंधित व्यापाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा अन्न सुरक्षा विषयक (फाॅस्टॅक )प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन हाॅटेल सिरॉक येथील लौकीक सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी, महासंघाचे माजी कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, जिल्हा कंजूमर प्राॅडक्ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनचे कार्यवाह विवेक नेवाळकर, शिवसेना उप जिल्हाप्रमुख महेश राणे, माजी सरपंच मंगेश टेमकर, प्रशिक्षक अंकुश जोगदंड, आचरा व्यापारी संघटना उपाध्यक्ष मंदार सांबारी, परेश सावंत, खजिनदार जयप्रकाश परूळेकर, संघटनेचे राजन पांगे, संदीप पांगम, गजानन गावकर, शैलेश वळंजू, सचिन गुळगुळे, सचिन हडकर, विकास साटम, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राजापूर येथील व्यावसायिक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रशिक्षक अंकुश जोगदंडे यांनी उपस्थितांना अन्न सुरक्षा नियमांबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसनही केले. या प्रशिक्षणाला आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस उपसरपंच संतोष मिराशी यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंदार सांबारी यांनी केले.












