सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : स्वतःच्या पत्नीवर चाकूने हल्ला केल्याच्या गुन्ह्यात आरोपी बेंजामिन घंटेपोक याला जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही एम देशमुख यांनी १ वर्ष सश्रम कारावासासह ५ हजार दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी युक्तिवाद केला. आरोपी घंटेकोप याने पिंगुळी येथे दुकानात काम करत असलेल्या आपली पत्नीवर चाकूने चार वार करून जखमी केले होते. आपल्यासोबत नांदत नाही या रागाने घंटेकोप याने पत्नी ला ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूहल्ला केला होता. याबाबत आरोपीवर आयपीसी कलम ३२४ नुसार गुन्हा शाबुत झाला. गुन्ह्याचा तपास पीएसआय गणेश कऱ्हाडकर यांनी केला होता.
पत्नीवर चाकूने हल्ला केल्याच्या गुन्ह्यात सूरज घंटेपोक ला सश्रम कारावासासह दंड












