कणकवली येथे ९ मार्च रोजी भव्य बौद्ध वधु – वर मेळाव्याचे आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी – कर्मचारी संघ सिंधुदुर्ग (रजि.) यांचे वतीने बौद्ध समजातील विवाह ईछूक वधु – वर युवक – युवतीसाठी व त्यांच्या पालकांसाठी दी.९ मार्च २०२५ रोजी कणकवली येथील गणपतराव सावंत सभागृह प्रशिक्षण केंद्र गोपुरी,नाईक पेट्रोल पंपाच्या मागे वागदे कणकवली येथे भव्य मंगलमैत्री स्नेहमेळावा व वधु – वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
कणकवली गोपूरी आश्रम येथे सकाळी १०.३० ते सायं.४.३० या वेळात संपन्न होणाऱ्या या बौद्ध वधु – वर मेळाव्याला सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी – कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष – आनंद धामापूरकर, कार्याध्यक्ष – के एस कदम,सचिव – मिलिंद सर्पे यांसह तथागत नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सिंधुदुर्ग चे अध्यक्ष अरविंद वळंजू यांची लविशेष उपस्थित असणार आहे.तर स.९.३० ते १.३० उपस्थित वधु वरांची नोंदणी ,चहापान व कार्यक्रमाचे उद्घघाटन त्यानंतर मान्यवरांचा सन्मान व वधु वर मेळावा दुपारी १.३० ते २.०० स्नेभोजन दुपारी २.३० ते ४.३० विविध गुणदर्शन कार्यक्रम व अध्यक्षीय मनोगत,आभार आणि समारोप असा संपूर्ण कार्यक्रम असणार आहे.
या वधु – वर मेळाव्यात सहभागी होणाऱ्या युवक युवतींना नोदणी फी ५०० /- रुपये ठेवण्यात आली असून वधु वरा सोबत आलेल्या प्रत्येक व्यक्तीस २०० /- रुपये फी तर सेवानिवृत्त अधिकारी – कर्मचारी यांना सहयोग मूल्य २००/- रुपये ठेवण्यात आले आहे. तरी ज्या विवाह इचुक युवक युवतींना या वधु – वर मेळाव्यात सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी आपली नावे सिद्धार्थ तांबे (कणकवली) – ९५२२३५०७७३ रुपाली पेंडूरकर(मालवण) – ९४२१२६३४९६,मोहन जाधव (सावंतवाडी) – ९४२३८८०१५३ सुभाष कांबळे (वैभववाडी) – ९५५२६३४४९७,विजय कदम (देवगड) – ८६००७२३९०१ आर डी कदम (कुडाळ) – ९४२०७३९२४८,अशोक सावळे (वेंगुर्ले) – ९४२११४४२७२,एस बी कदम(दोडामार्ग) – ९४२३५११९०२ यांचेकडे नोंदवावित असे आवाहन सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी – कर्मचारी संघ सिंधुदुर्ग यांचे वतीने करण्यात आले आहे.













