जि. प. प्राथमिक शाळा कलमठ गावडेवाडी येथे तृणधान्य पाककृती स्पर्धा संपन्न
कणकवली (प्रतिनिधी) : भारत हा जगातील पौष्टिक तृणधान्य पिकवणारा देश आहे. केंद्र शासनाने ज्वारी, बाजरी , नाचणी, वरई, राळा, कोदो, कुटकी, सावा, राजगिरा आदी पिकांना पौष्टिक तृणधान्याचा दर्जा दिला आहे. पण सध्या फास्ट फूडच्या जमान्यात ही पिके मागे पडत आहेत. याविषयी नागरिकांमध्ये, पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, तृणधान्यांचा दैनंदिन आहारात जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी आमच्या शाळेत विविध उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्यांविषयी जागरूकता वाढेल आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल या हेतूने आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलमठ गावडेवाडी येथे तृणधान्य आधारित पाककृती स्पर्धा संपन्न झाली. उत्स्फूर्त असा पालक सहभाग होता. विविध पदार्थ बनवले होते. सुबक मांडणी आणि उत्कृष्ट सादरीकरण झाले. यामध्ये खीर, भाकरी, धपाटे, लाडू, घावणे चटणी, दाल बाटी, थालीपीठ, धिरडे, बर्फी, इडली चटणी, फ्रेंकी, केक अशी पदार्थांची विविधता पाहायला मिळाली.
प्रत्येक स्पर्धकाने आपल्या पदार्थाची कृती आणि पोषकता सांगितली. स्पर्धेतील गुणानुक्रम१) शुभ्रा डवर मल्टीग्रेन रोटी फणसाची भाजी २) सुजाता डवर- बाजरीचे धिरडे आणि चटणी ३) शुभांगी पवार नाचणीचे घावणे चटणी. या स्पर्धेचे सौ सावंत आणि स्वरा लोके यांनी परीक्षण केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शुभांगी पवार आणि सर्व सदस्य, माता पालक, शिक्षक पालक उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य, मुख्याध्यापक रश्मी आंगणे सहशिक्षिका शितल गोवेकर, अंगणवाडी सेविका सुजाता खाजनवाडकर,मदतनीस गौरी गवळी,पालक सुनीतादेवी,अनिषा खाजनवाडकर,अनिता पवार,सारा शिंगाडे,सुजाता डवर, लक्ष्मीबाई शिंगाडे, अस्मिता पाटील, शुभ्रा डवर इत्यादी उपस्थित होत्या











