भाकरी आणि फूल कविसंमेलन व कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न

कोमसाप शाखा कुडाळचे आयोजन

कुडाळ (प्रतिनिधी) : कोमसाप शाखा कुडाळच्या वतीने जिल्ह्यातील तालुका शाखांच्या कार्यकारिणी सदस्यांचा मेळावा व भाकरी आणि फूल हे कवी संमेलन असे कार्यक्रम आयोजित केले होतै. शाखाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, जिल्हा कार्यवाह विठ्ठल कदम, जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे, जिल्हा समन्वयक रूजारिओ पिंटो, सावंतवाडी शाखाध्यक्षवसंतोष सावंत, कवी संमेलनाध्यक्ष डाॅ. दिपाली काजरेकर कुडाळ शाखेचे कार्यवाह सुरेश पवार, गोविंद पवार, स्नेहल फणसळकर, स्वाती सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याला जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यानी मार्गदर्शन करताना आपण ऐक्य व सहकार्य यानी काम करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोमसापच्या रूपाने साहित्यिक चळवळ पुढे नेऊया. मधू भाईंचे स्वप्न साकार करूया असे सांगितले. विठ्ठल कदम व भरत गावडे यानीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष पदावरून बोलताना वृंदा कांबळी यानी एवढी मोठी संस्था चालवताना सर्वाना जोडणारा विचारांचा एक मजबूत धागा असायला हवा आणि तो धागा म्हणजेच कोमसापवरील निष्ठा. कोणताही स्वार्थ न ठेवता निष्ठेने कार्य करताना आपण कोमसापच्या माध्यमातून मोठी कार्ये करू शकतो. असे सांगितले. प्रास्ताविक सुरेश पवार यानी केले. सूत्रसंचालन प्रा. गोविंद पवार यानी केले. आभार स्वाती सावंत यानी मानले.

दुसर्या सत्रात डाॅक्टर दिपाली काजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भाकरी आणि फूल या कविसंमेलनात चौतीस लोकानी स्वरचित कविता सादर केल्या. यात विविध विषयांवर व विविध प्रकारच्या रचनांमधून कविता सादर झाल्या. संमेलनाध्यक्ष डाॅक्टर दिपाली काजरेकर यानी ज्ञानेश्वरांपासून कवी केशवसुतांच्या व नंतरच्या कालखंडातील काव्य प्रवाहाचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. नवोदिताना याचा अभ्यास करावा नवनवीन प्रयोगांमधून विविध विषयावर कविता करण्याचा प्रयत्न करावा. कवी संमेलनाचे ओघवत्या भाषेतील सूत्रसंचालन स्नेहल फणसळकर यानी केले.

कविसंमेलनात रूजारिओ पिंटो, विठ्ठल कदम, सुरेश पवार, शेलेस्तिन शिरोडकर, अॅड. नकुल पार्सेकर, मधुकर जाधव, स्वाती सावंत, ऋतुजा केळकर, नारायण धुरी, मंदार सातबारा,राजेंद्र गोसावी, सुरेंद्र सकपाळ, दिपक पटेकर, सुस्मिता राणे,अनिल पोवार, अविनाश पाटील, दिलीप चव्हाण, प्रगती पाताडे, भानुदास तळगावकर, प्रदीप केळुसकर, आदिती मसूरकर, रिमा भोसले, स्मिता नाबर,कल्पना मलये,प्रा. सुभाष गोवेकर,कॅप्टन एस.टीप. आवटी, राजस रेगे, अनुष्का रेवणकर, संतोष वालावलकर, बुधाजी कांबळी इत्यादी साहित्यप्रेमी उपस्थित राहून काव्यवाचन केले.

error: Content is protected !!