घोणसरी आणि कोंडये ग्रामपंचायत ला राज्य शासनाचा तालुकास्तरीय आदिशक्ती पुरस्कार जाहीर

२५ हजार रक्कम पारितोषिक देऊन करण्यात येणार सन्मान

फोंडाघाट (प्रतिनिधी) : बालके आणि महिलांच्या सबलीकरणासाठी ग्रामपंचायत द्वारे त्यांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणार्‍या, कोंडये ग्रामपंचायतला द्वितीय आणि घोणसरी ग्रामपंचायतला तृतीय क्रमांक कणकवली तालुकास्तरीय ग्रामपंचायत विभागात मिळाला आहे. त्यांना लवकरच विशेष पुरस्कार सोहळ्यात आदिशक्ती पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. याबद्दल कणकवली तालुका व पंचक्रोशीत त्यांचे अभिनंदन होत आहे. यासाठी आपले योगदान देणारे ग्रामपंचायत सरपंच सदस्य व कर्मचारी तसेच ग्रामस्थ आणि शासनाचे कोंडये गावचे ज्येष्ठ नागरिक अण्णा तेंडुलकर यांनी रवी तेली सह सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!