ग्रामीण भागातील बचत गटांचे कार्य कौतुकास्पद जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत

बांदा (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील् सत्यम महिला प्रभाग संघ,बांदा संघाचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. महिलांनी यापुढेही लहान-मोठे उद्योग सुरू करावेत. महिलांना भाऊ म्हणून मदतीसाठी हाक देण्याचे आवाहन जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले. सत्यम महिला प्रभाग संघ,बांदा संघाची ५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.29 जुलै) रोजी आनंदी मंगल कार्यालय, बांदा येथे मोठ्या उत्साहात आणि सभासदांच्या उदंड उपस्थितीत पार पडली. सभेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी पंचायत समिती सभापती सुश्मिता जाधव, बांदा सरपंच प्रियाका नाईक,उपसरपंच रत्नाकर आगलावे, माजी जि.प. सदस्य श्वेता कोरगावकर, MSRLM तालुका व्यवस्थापक स्वाती रेडकर व रिदीमा पाटकर, सिंधुदुर्ग बँक शाखा बांदा व्यवस्थापक जगदीश चव्हाण व जिल्हा व्यवस्थापन MSRLM टीम, तसेच जिल्हा महिला व बालविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला सत्यम प्रभाग संघ सचिव हर्षदा गवस व कोषाध्यक्ष एकता गवस यांनी मागील वर्षाचा वार्षिक अहवाल आणि जमा-खर्च पत्रक सभासदांसमोर मांडले. सत्यम समूहाने गेल्या आर्थिक वर्षात उल्लेखनीय प्रगती केली असून हे यश सभासदांच्या विश्वासाचे आणि सहकार्याचे प्रतीक आहे, असे मत सत्यम प्रभागसंघ अध्यक्षा दिपाली बांदेकर यांनी व्यक्त केले मागील आर्थिक वर्षाचा ताळेबंद आणि हिशोब एकमुखाने मंजूर करण्यात आला. समूहाचा विस्तार करणे आणि सभासदांसाठी नवीन योजना राबविण्याबत महत्त्वपूर्ण ठराव संमत झाले. सभेच्या ठिकाणी महिलांनी विविध स्टॉलची मांडणी केली होती, सर्व उपस्थितांनी आस्वाद घेतला. संपूर्ण सभेचे नियोजन प्रभागसंघ व्यवस्थापक शिल्पा सावंत आणि त्यांच्या सहकारी यांनी केले. सूत्रसंचालन समीर नाईक यांनी केले. आभार लक्ष्मी सावंत यांनी मानले. स्नेहभोजनाने सभेची सांगता झाली.

error: Content is protected !!