महाराजस्व अभियानांतर्गत कोळोशी ग्रामपंचायतच्या वतीने आधारकार्ड कॅम्प चे यशस्वी आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार कोळोशी ग्रामपंचायत व पोस्ट ऑफिस कोळोशी मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत आधार कार्ड कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सरपंच गुरुनाथ आचरेकर, उपसरपंच अतुल गुरव, ग्रामपंचायत सदस्य सुचिता पोकळे, सिद्धार्थ तांबे, आरोग्य उपकेंद्र आयनल चे डॉ.बजंत्री, पोस्टमास्टर वृषाली कुंभार, पोस्टमन घाडीगावकर, केंद्र्चालक पुर्वा तांबे, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष तावडे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. हा कॅम्प दोन दिवस आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे यांनी केले.

error: Content is protected !!