रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चा पदग्रहण सोहळा उस्ताहात संपन्न

अध्यक्षपदी मंगेश ब्रम्हदंडे, सचिव पदी सुबोध देसाई तर खजिनदार पदी शर्मिन काझी यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवेशद्वारा असलेल्या खारेपाटण शहरात सन २०२५ मध्ये स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ खारेपाटण च्या पहिल्या वर्षाचा पदग्रहण सोहळा शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी खारेपाटण हायस्कूलच्या कै. चंद्रकांत परीसा रायबागकर सभागृहात इंस्टॉलिंग ऑफिसर रोटरीयन प्रणय तेली यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.

या पदग्रहण सोहळ्यात रोटरी क्लब खारेपाटण च्या प्रेसिडेंट पदी रोटरीयन मंगेश ब्रम्हदंडे, व्हाइस प्रेसिडेंटपदी रोटरी यन डॉ उमेश बालन यांची व सेक्रेटरी पदी रोटरीयन सुबोध देसाई यांची तर ट्रेझरियन पदी रोटरीयन शर्मिन काझी यांची निवड करण्यात आली. यावेळी इन्स्टॉलिंग ऑफिसर रोटरीयन प्रणय तेली यांच्या शुभहस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्याकडे नवीन वर्षाचा पदभार सुपूर्द करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे माजी अध्यक्ष दयानंद कोकाटे, सचिव अजय गुरसाळे, खजिनदार सारिका महिंद्र, प्रियशा अमृते यांचा देखील खारेपाटण रोटरी क्लब चे वर्षभर काम चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला असिस्टंट गव्हर्नर रोटरीयन बिपिनचंद्र गांधी, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ, रोटरीयन डॉ.विद्याधर तायशेट्ये, शशिकांत चव्हाण, महादेव पाटकर, याबरोबरच जिल्ह्यातील विविध रोटरी क्लब चे अध्यक्ष सचिव व सदस्य उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे सदस्य रोटरीयन संतोष पाटणकर, संतोष रानडे, डॉ. ए डी कांबळे, संतोष राऊत, संजय कोकाटे, लक्ष्मीकांत हरयाण, यशवंत रायबागकर, संतोष राऊत, भाऊ राणे, प्राजक्ता कोकाटे, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रोटरी यन प्रणय तेली म्हणाले ” रोटरी ही जागतिक पातळीवरची सामाजिक संघटना असून समाजाच्या सेवेसाठी उदात्तपणे कार्य करत आहे. तर रोटरी मध्ये सर्व प्रकाराच्या घटकांना सोबत घेऊन काम करण्याचे सामर्थ्य आहे. तर खारेपाटण रोटरी क्लब चे कार्य कौतुकास्पद असून फक्त एक वर्षाच्या कालावधीत या क्लब घेतलेली झेप समस्त रोटरी परिवारासाठी निश्चितच गौरवास्पद अशीच आहे.” असे सांगितले. यावेळी खारेपाटण रोटरी क्लब च्या वतीने युवा उद्योजक मंदार पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते म्हणून भाऊ राणे, आदर्श शिक्षक संतोष राऊत व गुणवंत विद्यार्थी कुमार हरयान यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

रोट्रियन राजेश घाटवळ व महादेव पाटकर यांच्या वतीने खारेपाटण रोटरी क्लब करीता आजारी रुग्णाकरिता लागणारे बेड व अत्यावश्यक व्हील चेअर, टॉयलेट चेअर, ऑक्सिजन कॉन्सोडर आदि साहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी खारेपाटण रोटरी क्लब अंतर्गत युवकांचा रोटरॅक्ट क्लब स्थापन करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम सर यांनी तर प्रास्ताविक रोटरीयन संजय सानप यांनी केले व प्रमुख पाहुण्याचा परिचय रोटरीयन अजय गुरसाळे यांनी करून दिला. व सर्वांचे आभार रोटरीयन सुबोध देसाई यांनी मानले.

error: Content is protected !!