फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त फोंडाघाट ग्रामपंचायत मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत गावातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना चावी प्रदान सोहळा आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य राजन चिके, सरपंच संजना आग्रे, उपसरपंच तन्वी मोदी, ग्रामपंचायत सदस्य सायली तेली प्रीतम भोगले, पवन भोगले, मिलिंद लाड, विठ्ठल लाड, अमित चव्हाण अनिकेत पारकर तसेच लाभार्थी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे यांनी केले.












