जाणवली विभागातील विकासकामांसाठी निधी द्या

पालकमंत्री नितेश राणेंकडे भाजपा तालुका उपाध्यक्ष संदीप सावंत यांची मागणी; पालकमंत्र्यांचा तात्काळ सकारात्मक प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : जाणवली विभागातील विविध विकासकामांसाठी भरीव विकासनिधी देण्याची मागणी भाजपा तालुका उपाध्यक्ष संदीप सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी संदिप सावंत यांच्या मागणीला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत विकासनिधी देण्याचा शब्द दिला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अमोल रासम, नयन दळवी उपस्थित होते. संदीप सावंत यांनी जाणवली विभागातील जाणवली, बेळणे, सावडाव आदी गावांतील पुढील विकासकामांसाठी निधी देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली आहे. जाणवली वायंगवडेवाडी दळवीवाडी ते ग्रामीण मार्ग 226 ला जोडणारा ग्रामीण मार्ग 230 रस्ता काँक्रीटीकरण करणे, जाणवली डोंगरेवाडी सापळेबाग येथील गट नंबर 821अ/65 खुलेक्षेत्र सुशोभिकरण करणे, जाणवली हायवे ते डोंगरेवाडी गणपती सान्यापर्यंत जाणारा रस्ता नूतनीकरण करणे, बेळणे तिवरे डामरे मार्ग ग्रामीण मार्ग जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, सावडाव धबधबा येथे सुशोभिकरण करणे आदी विकासकामांसाठी निधी देण्याची मागणी संदीप सावंत यांनी केली.

error: Content is protected !!