खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण शुक नदी येथे कुडाळ, पिंगुळी येथील युवक दिगंबर वाळके वय -२९ हा नदीत आंघोळ करण्यासाठी पाण्यात गेला असता बुडून मरण पावला.ही घटना काल बुधवार दी.२६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं.४.०० च्या दरम्यान घडली. मात्र बुडालेला मृतदेह अद्याप सापडला नसल्यामुळे पोलीस पथक ग्रामस्थांसह शोध घेत आहेत.
याबाबत अधिक वृत्त असे की,खारेपाटण शुक नदी येथील हसोळटेंब कोंडवाडी येथे असलेल्या जुन्या नदीवरील धरणाजजवळील नदीच्या पाण्यात कुडाळ पींगुळी येथील व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर असलेला युवक दिगंबर वाळके व त्याचा मित्र राहुल वाघ (सातारा ) हे खारेपाटण येथे दी.२६ रोजी आले असता त्यांना खारेपाटण येथील शुक नदीच्या पाण्याचा मोह आवरला नाही.यामधे दिगंबर वाळके हा युवक पाण्यात आंघोळ करायला म्हणून गेला तो पुन्हा पाण्याच्या बाहेर आलाच नाही.सोबत असलेला मित्र राहुल वाघ यांनी घटनेची माहिती खारेपाटण पोलीस स्टेशनला दिली.
अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण पोलीस दूरशेत्राचे पोलीस अधिकारी माने,पराग मोहिते तसेच पोलीस पाटील दिगंबर भालेकर यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली.व तपास शोध कार्य सुरू केले.स्थानिक नागरिकांच्या मदतिने पाण्यात जाऊन शोध घेण्यात आला.मात्र तब्बल २० तास होऊन गेले तरी नदीच्या पाण्यात बुडालेल्या युवकाचा अद्याप मृतदेह सापडलेला नाही.त्यामुळे परिसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे. तर हा अपघात आहे की घातपात याबाबत देखील नागरिकांमध्ये संभ्रम आहे.आता पोलीस प्रशासन कडून शोध कार्यासाठी स्पीड बोट मागविण्यात आली असून याद्वारे बुडालेल्या युवकाचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.तर या घटनेचा अधिक तपास खारेपाटण पोलीस करत असेत.












