लक्षतीर्थ महाशिवरात्री यात्रेनिमित्त श्री दत्त साई रिक्षा मित्र मंडळ तर्फे रिक्षा सौंदर्य स्पर्धा 2025 चे आयोजित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाशिवरात्री निमित्त श्री दत्त साई रिक्षा मित्र मंडळ लक्षतीर्थ वसाहत यांच्या वतीने रिक्षा सौंदर्य स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक – 11,111/- व चषक, द्वितीय क्रमांक – 6,666/- व चषक, तृतीय क्रमांक – 4,444/- व चषक, चतुर्थ क्रमांक – 3,333/- व चषक, आयोजित करण्यात आले आहे.

आकर्षक सजावट आणि प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून बनविण्यात आलेल्या रिक्षा घेऊन रिक्षाचालक या स्पर्धेत उत्साहाने आणि हौसेने सहभागी होतात. गडहिंग्लज,चिकोडी, मलकापूर,रत्नागिरी सिंधुदुर्ग,सांगली, कोल्हापूरसह अन्य शहरांमधूनही या स्पर्धेत रिक्षाचालक मोठय़ा हौसेने सहभागी झाले होते. रिक्षाचालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जागृती करणे हादेखील या स्पर्धेमागचा उद्देश होता, या स्पर्धेत रिक्षाची अंतर्गत आणि बाहय़ सजावट बघितली गेली. तसेच या सजावटीबरोबरच रिक्षाचालकांकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचाही विचार केला. प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोबाइल चार्जर, पंखा,टिव्ही,फ्रिज अशा विविध सुविधा रिक्षाचालक त्यांच्या रिक्षांमध्ये उपलब्ध करून दिल्या होत्या.महाराष्ट्रातील 12 शहरांमधून या स्पर्धेत रिक्षाचालक सहभागी झाले होते. स्पर्धेत विजेत्या रिक्षाचालकांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले, या स्पर्धेदरम्यान रिक्षाचालकानी रिक्षांची साहसी प्रात्यक्षिकेही सादर केली.

पंच म्हणून, संतोष नेवडे, सचिन हारळेकर,वीरेंद्र कोगे आणि काम पहिले. स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष निरंजन चिटणीस, उपाध्यक्ष अझर नदाफ, खजिनिस सय्यद,कुणाल लोमटे, विकास चव्हाण,लातूर लोमटे, बाळू चौगुले,सत्तार बागवान, हरिष खेडेकर यांनी केले.

error: Content is protected !!