खारेपाटण शहरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छ्ता मोहीम

एकूण ३०० सदस्याचा स्वच्छ्ता मोहिमेत सहभाग

सुमारे १६ टन कचरा करण्यात आला गोळा

खारेपाटण (प्रतिनिधी) : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांचे वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण या शहरात आज रविवार दी.२ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वच्छ्ता मोहीमेचा कार्यक्रम राबविण्यात आला.यावेळी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर व उपसरपंच महेंद्र गुरव यांच्यासह ग्रा.पं.सदस्य यांसह गावातील नागरिकांनी या स्वच्छ्ता मोहिमेत उस्फुर्त सहभाग घेतला.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबविले जात असून आजच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण व रत्नागिरी जिल्ह्यातील पाचल या गावात प्रतिष्ठान च्या वतीने स्वच्छ्ता मोहीम राबविण्यात आली. यावेळी प्रतिष्ठान चे सुमारे ३०० पेक्षा अधिक श्री समर्थ सदस्य यांनी मोहिमेत सहभाग घेऊन सकाळी ८ ते ११ या वेळेत सुमारे खारेपाटण गावातील विविध सार्वजनिक ठिकाणचा सुमारे १६ तन कचरा गोळा करण्यात आला.

या स्वच्छ्ता मोहिमेत रत्नागिरी राजापूर व खारेपाटण विभागातील अनेक गावातील श्री समर्थांच्या बैठकितील सदस्य उपस्थित होते. यावेळी खारेपाटण गावातील एस टी बस स्थानक परिसर ,मासळी मार्केट,आठवडा बाजार परिसर ,लिकी व्हाळ,चव्हाटा देवस्थान परिसर,खारेपाटण बाजारपेठ ,सार्वजनिक स्मशानभूमी जैनपार,ग्रामपंचायत रोड मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग रामेश्वर नगर खारेपाटण रस्ता,चेकपोस्टन खारेपाटण,खारेपाटण हायस्कूल ते बाजपेठ रोड,श्री देव रवळनाथ मंदिर परिसर आदी भागातील स्वछता व साफ सफाई डॉ. नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली.यावेळी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर उपसरपंच महेंद्र गुरव,सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव,ग्रा.पं.सदस्य जयदीप देसाई,किरण कर्ले, सुधाकर ढेकणे, शितीजा धुमाळे,अमिषा गुरव, मानली होनाळे,दक्षता सुतार,आदी उपस्थित होते. यावेळी खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांनी खारेपाटण गावच्या वतीने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चे आभार मानून त्यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले व त्यांना शुभेछा दिल्या.

error: Content is protected !!