डॉ.नानासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम–
फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परिसरातील प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी फोंडाघाट एसटी स्टँड आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात स्वच्छता मोहीम फत्ते केली.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकाच दिवशी हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. श्री बैठक फोंडाघाट मधील सुमारे 216 श्री सदस्यांनी विनामूल्य या मोहिमेत भाग घेऊन सुमारे तीन टन सुका, व दोन टन ओला कचरा जमा करून आपली सेवा रुजू केली. त्यामुळे दोन्ही ठिकाणचा परिसर कचरामुक्त, स्वच्छ दिसत होता. यावेळी एसटी कंट्रोलर पवार यांनी प्रतिष्ठानच्या सर्व श्री सदस्यांचे आभार मानले. आपल्या स्थानकाची,आरोग्य केंद्राची निगा राखताना परिसर कचरामुक्त स्वच्छ ठेवणे,ही प्रत्येक प्रवासी- रुग्ण- ग्रामस्थांची जबाबदारी आहे. यासाठी जागोजागी कचराकुंड ठेवण्यात आले आहेत. कृपया सर्वांनी याकरिता सहकार्य करावे,असे त्यांनी आवाहन केले. ही स्वच्छता केली सुमारे पाच तास संपन्न झाली.या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.












