तळेरे बसस्थानकाच्या जीर्ण इमारतीच्या बांधकामसह होणार परिसर सुशोभीकरण

मत्स्योद्योगमंत्री नितेश राणे यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी

एसटी च्या महाव्यवस्थापकांकडे संतोष कानडे,दिलीप तळेकर,बाळा जठार यांनी दिले निवेदन

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील नॅशनल हायवेवरील आणि रत्नागिरी कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणाऱ्या तळेरे एसटी बसस्थानक इमारतीची दुरावस्था झाली असून तळेरे एसटी बसस्थानक इमारत बांधणे व परिसर सुशोभीकरण करण्यासंदर्भात मत्सोद्योग व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी लेखी पत्राद्वारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी केली आहे.याबाबत राजर्षी शाहू महाराज कलाकार मानधन समिती चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले होते.मंत्री नितेश राणे यांच्या या मागणीचे पत्र एसटी चे बांधकाम विभागाचे जनरल मॅनेजर दिनेश महाजन यांच्याकडे आज भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, राजर्षी शाहू महाराज कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, माजी जि प सभापती बाळा जठार यांनी दिले.

error: Content is protected !!