विविध उपक्रमांनी अर्जुन रावराणे विद्यालयात महिला दिन साजरा

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने प्रशालेत आयोजित कार्यक्रमास देण्यात आल्या शुभेच्छा

वैभववाडी (प्रतिनिधी) : आज ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वत्र विविध उपक्रमांचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात सर्व विद्यार्थीनी व महिला कर्मचाऱ्यांसाठी शाळेच्या पहिल्या सत्रात संगीत खुर्चीसह अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिपाठाच्या वेळी इयत्ता पाचवी चा विद्यार्थी ओम रावराणे याने कर्तुत्ववान महिलांची यशोगाथा याबाबत थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशालेच्या सर्व महिला कर्मचारी वर्गाला पुष्प देऊन त्यांचा सन्मान केला गेला. त्यानंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थीनी व महिला कर्मचाऱ्यांसाठी काव्य वाचन, संगित खुर्ची व अन्य काही मजेशीर खेळ सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रशालेत घेण्यात आले. या सर्व कार्यक्रमांना वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक बी.एस.नादकर, एस.बी.शिंदे, आर.बी.चौगले, सांस्कृतिक विभाग प्रमुख पी.बी.पवार, एम.एस.चोरगे. सर्व शिक्षक – शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!