चर्मकार समाज उन्नती मंडळाची उद्या वार्षिक सर्वसाधारण सभा

जिल्हा पदाधिकारी यांची असणार प्रमुख उपस्थिती

पुढील तीन वर्षाकरीता होणार नुतन कार्यकारणीची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ (रजि.) सिंधुदुर्ग शाखा- कणकवलीची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या दि. ०९/०३/२०२५ रोजी मराठा मंडऴ हॉल कणकवली येथे सकाळी ठिक १० वाजता विद्यमान तालुका अध्यक्ष महानंद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.

या सभेच्या अनुषंगाने पुढील सन- २०२५- २०२८ या कालावधीकरीता नुतन कार्यकारणी निवड होनार असुन या सभेस प्रमुख उपस्थिती म्हणुन चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हा अध्यक्ष सुजित जाधव, जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, जिल्हा खजिनदार नामदेव जाधव यांच्या सहीत जिल्हा व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी कणकवली तालुक्यातील सर्व आजीव सभासद व ज्ञाती समाज बांधव यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहुन सहकार्य करावे असे आवाहन तालुका सचिव अविनाश चव्हाण यांनी केले आहे.

error: Content is protected !!