फोंडा हायस्कूलची माजी विद्यार्थिनी पुष्पालता वालावलकर हिचा दिल्ली मध्ये मराठी झेंडा !

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तीची ” वळीव ” कविता लक्षवेधी !

स्मृतिचिन्ह व सन्मानपत्राने गौरव

फोंडाघाट (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघा ची माजी विद्यार्थीनी पुष्पालता शं. वालावलकर (सध्याची — विशाखा संजीव गाळवणकर ) हिने आपली “वळीव ” ही स्वरचित कविता सादर करून, उपस्थित रसिकांचे कौतुक मिळविले. दिल्लीमध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या,९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना मधील कवी कट्ट्यावर, पुष्पालता हिने आपली ‘वळीव’ ही लक्षवेधी काव्यरचना सादर केली. त्याकरिता सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह मान्यवरांचे हस्ते देऊन तिचा गौरव करण्यात आला.

मराठीचा कोकणी झेंडा साहित्य संमेलनात, दिल्लीवर दिमाखात फडकविल्याबद्दल, न्यू इंग्लिश स्कूल चे शिक्षक वर्ग, विद्यार्थी – पालक वर्ग,तसेच सर्वांगीण विकासाकरता झटणारी संलग्न शाखा “नीव फाउंडेशन ” फोंडाघाटच्या पदाधिकारी व सदस्यांकडून आनंद व्यक्त होत आहे. तसेच फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेश (राजू) सावंत- पटेल आणि संचालक- सदस्यांकडून तसेच पंचक्रोशीत तिचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!