तिथवली नानीवडे फाटा येथे केली धडक कारवाई
वैभववाडी (प्रतिनिधी) : तिथवली नानीवडे फाटा येथे गोवा बनावटीची सुमारे ३ लाख २० हजार रुपयाची दारू व सुमारे ४ लाखाचा टेम्पो असा ७ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही. या प्रकरणी टेम्पो चालक प्रवीण गणेशराम बिशनोई रा. पाली राज्य राजस्थान याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. वैभववाडी पोलिसांनी रविवारी सकाळी ७. ३० वाजण्याच्या सुमारास ही धडक कारवाई केली.
आगामी होळी उत्सवाच्या पार्शवभूमीवर वैभववाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या सूचनेनुसार पोलीस राहुल तळस्कर, श्री.राजेंद्र शेळके, हरिचंद्र जायभाय यांनी खारेपाटण गगनबावडा मार्गावर तिथवली नानीवडे फाटा येथे नाकाबंदी केली होती. सकाळी ७. ३० वा. सुमारास खारेपाटणहुन तिथवलीच्या दिशेने येणारा टेम्पो पोलिसांनी थांबवाला. त्याच्याकडे वाहन परवाना व टेम्पोची कागदपत्रे तपासली. यावेळी त्यांनी टेम्पोच्या हौदयाची तपासणी केली असता, गोवा बनवाटीचे दारूचे बॉक्स आढळून आले. याबाबत पोलीस निरीक्षक अवसरमोल यांना माहिती देऊन दारूच्या बॉक्ससह टेम्पो वैभववाडी पोलीस ठाणेत आणून रीतसर पंचनामा केला. यावेळी एम्परियल ब्लु नावाची गोवा बनावटीची दारूचे ७६ बॉक्स आढळून आले. त्याची सुमारे ३ लाख २० किंमत आहे. तर दारू वाहतूक करण्यात येत असलेला सुमारे ४ लाख रुपये किंमतीचा टेम्पो सुद्धा जप्त करण्यात आला आहे. तर चालक बष्णोई यांच्यावर विनापारवाना दारू वाहतूक करत असले प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.












