फोंडा स्थानकावर येणाऱ्या सर्व एसटी गाड्या स्टॅन्डवर येऊन, गगनबावडा- वैभववाडी मार्गे पाठवाव्यात-पंचक्रोशीतील प्रवाशांची आग्रही मागणी
राधानगरी- फोंडा – घाट परिसरातील विद्यार्थी ,रुग्ण, ग्राहक, ग्रामस्थांना पुढील दिवस त्रासदायक ठरणार—
दर दोन तासांनी राधानगरी कारिवडा फोंडा मार्गे कणकवली एसटी अथवा मिनीबस ची मागणी !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : १० मार्चपासून पुढील ४५ दिवस राधानगरी दाजीपूर रस्ता- पूल च्या पुनर्बांधणीसाठी,फोंडाघाट रस्ता जड वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचा, आदेश कोल्हापूर- सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी पारित केला आहे. त्यामुळे घाटमार्गे होणाऱ्या जड वाहने, एसटी, खाजगी वाहने, व्होल्व्हो बसेस गगनबावडा- वैभववाडी मार्गे वळविण्यात आली आहेत. फोंडा लोरे तिठा वर कोल्हापूर ठेकेदारांनी ब्बॅरिकेटस उभे करून पोलीस ठेवले आहेत. यांचे कडून वाहन चालकांना सूचना देण्यात येत आहेत. मात्र दुचाकी व चार चाकी हलकी वाहने, फोंडा घाटातून कारीवडा मार्गे राधानगरी- कोल्हापूर कडे पाठवण्यात येणार आहेत.
या बदलामुळे फोंडा – घाट मार्गे बाजाराकरिता येणारे ग्रामस्थ, औषधोपचारासाठी रुग्ण- वयोवृद्ध, तसेच शाळा कॉलेज साठी येणारे विद्यार्थी यांना गाड्या नसल्यामुळे अतोनात हाल सहन करावे लागणार आहेत. त्यामुळे मधील न्यू करंजे ,कदमवाडी, बांबर,शेळप, हसणे, सतीचा माळ या ग्रामीण गावातील ग्रामस्थ,विद्यार्थी यांनी दर दोन तासांनी राधानगरी- फोंडाघाट मार्गे कणकवली एसटी अथवा मिनी बस सोडावी. याची राधानगरी- कणकवली एसटी व्यवस्थापनाने नोंद घ्यावी, अशी आग्रही मागणी केली आहे ..
तसेच फोंडाघाट एसटी स्टँडवरून, आजवर इथे येऊन सुटणाऱ्या गाड्यांपैकी एकही गाडी तरळा मार्गे वळवू नये, किंबहुना त्या गाड्या नेहमीप्रमाणे फोंडा स्टॅन्ड ला येऊन वैभववाडी मार्गे जाव्यात. याची गंभीर दखल कणकवली स्थानक प्रमुख, डेपो प्रमुख, तसेच जिल्हा एसटी अधीक्षक यांनी घ्यावी, अशी आग्रही मागणी फोंडाघाटवासिया तर्फे प्रवासी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत सरपंच ग्रामपंचायत फोंडा यांचे कडूनही संबंधित एसटी कार्यालयांना सूचना पत्र पाठविण्यात आले आहे. यामध्ये फेरफार झाल्यास त्याचे गंभीर पडसाद उमटतील, असा इशाराही देण्यात आला आहे ….
तसेच पूर्णभारमानात यापूर्वी सुरू असणाऱ्या कुडाळ- पुणे, बांदा – कोल्हापूर, मालवण- पुणे या गाड्या अधिकाऱ्यांच्या लहरीपणामुळे गेल्या दोन-चार महिन्यात बंद करण्यात आल्या आहेत.त्या सुद्धा त्वरित सुरू करून दिलासा द्यावा. अशी मागणी फोंडाघाट प्रवासी संघटने कडून करण्यात आली आहे. याची संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी…..












