श्री रामेश्वर वाचन मंदिर आचराचीमहिला दिना निमित्त आयोजित होमिनिस्टर स्पर्धा
आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या वाचन मंदिराने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपल्या महिला सभासदांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धेत 32 स्पर्धकांना सहभाग देण्यात आला. या स्पर्धेत सौ. नेहा संदीप नलावडे प्रायोजित पैठणीची मानकरी सौ. विशाखा विष्णू भाटकर तर ढेकणे कुटुंबियांच्या सोन्याच्या नथीची मानकरी सौ. मधुरा महेश परब ठरली. सदर स्पर्धा सहा फेऱ्यामध्ये घेण्यात आली. या स्पर्धेचे इतर प्रायोजक होते. सौ. उर्मिला सांबारी, सीमा घुटुकडे, प्रणया टेमकर, सई राणे, सुमित्रा गुरव, वैशाली सांबारी, अस्मिता गवस, रक्षिता शानभाग, गीता खेडेकर, अंजली बापर्डेकर, नेहा घाडी, स्वाती पेडणेकर, शोभा सुखटणकर, गीता नायर, मानसी राणे, अंजली राणे, स्मिता परब, वैशाली देसाई. या प्रायोजकांद्वावारे प्रत्येक फेरीत स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली. उपस्थित प्रेक्षकांसाठी प्रश्न मंजुषा स्पर्धा घेऊन आकर्षक बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सांस्कृतिक समिती सदस्या सौ. वर्षा सांबारी यांनी तर आभार सौ. भावना मुणगेकर यांनी मानले. उपस्थित महिलांना संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबाजी भिसळे व सौ. उर्मिला सांबारी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य, सांस्कृतिक समिती सदस्य, ग्रामस्थ तसेच मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे संपूर्ण मजेशीर सूत्रसंचालन ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी यांनी केले. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे कर्मचारी श्री. महेश बापर्डेकर, सौ. समृद्धी मेस्त्री -बापर्डेकर, स्वप्निल चव्हाण आणि ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी यांनी केले.












