शूटिंगबॉल स्पर्धेत जयंत घोरपडे स्पोर्ट्स सोलापूर संघ अजिंक्य !

फेडरेशन रेफरी अशोक दाभोलकर-मेस्त्री, मुंबई शूटिंगबॉलचे सचिव दिपक सावंत यांचा विशेष सन्मान

मसूरे (प्रतिनिधी) : रंजन क्रीडा मंडळ, देवाळे, वसई, पालघर आयोजित राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक जयंत घोरपडे स्पोर्ट्स टेंबुर्नी, सोलापूर, द्वितीय इस्तियाक- मालेगांव, नाशिक, तृतीय कै. राधा दामोदर, अलिबाग, रायगड, चौथा संजय भोसले प्रतिष्ठान, माळशिरस, सोलापूर पटकावले. स्पर्धेचे औचित्य साधून मुंबई शूटिंगबॉलचे सचिव दिपक सावंत व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूतपूर्व फेडरेशन रेफरी व क्रीडा संस्कृती प्रचारक श्री अशोक दाभोलकर मेस्त्री यांना पालघर जिल्हात गेली तीन दशके शूटिंगबॉल खेळाचा प्रचार व प्रसारासाठी दिलेल्या सेवेबद्दल प्रमुख पाहुणे सुदेशजी प्रभाकर चौधरी – वसई तालुका प्रमुख ह्यांचे शुभहस्ते गौरविण्यात आले. त्यावेळी व्यासपिठावर ओनिलजी जॉन आल्मेडा (संचालक,बसीन कॅथोलिक को ऑप. बँक लि.), नरेंद्र रघुनाथ राऊत (अध्यक्ष,सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळ, वसई), सुरेश प्रभाकर वर्तक ( कार्यकारी विश्वस्त,सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ), दिपक सावंत ( सचिव- मुंबई शूटिंगबॉल) आदी मान्यवर उपस्थित होते. ह्या स्पर्धेत डायरेक्ट शूटिंगबॉल संघटनेचे अध्यक्ष संजय कदम ह्यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या व सिंधुदुर्ग जिल्हाचा नामवंत खेळाडू रिकी नेमण ह्याच्या नैतृत्व लाभलेल्या सिंधुदुर्ग संघानी उल्लेखनीय खेळ करीत स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावला. ह्या स्पर्धेत महाराष्ट्रातील २४ नामवंत संघानी भाग घेतला होता.

error: Content is protected !!