डेंटिस्ट विशाल घाणेकर यांचे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी केले अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली विभागातील कर्मचारी संदेश घाणेकर यांचा चिरंजीव डॉ. विशाल यांनी बीडीएस पदवी प्राप्त केल्याबद्दल कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी डॉ. विशाल यांचे अभिनंदन केले. डॉ. विशाल यांनी योगिता महाविद्यालय खेड येथून बीडीएस ही पदवी प्राप्त केली. डॉ. विशाल यांचे बारावी पर्यंत चे शिक्षण एस एम हायस्कूल कणकवली येथे झाले. त्यानंतर त्यांनी बिडीएस साठी खेड येथील योगिता महाविद्यालयात प्रवेश घेतला. नुकताच बीडीएस परीक्षेच्या अंतिम वर्षाचा निकाल लागला असून त्यात डॉ. विशाल घाणेकर यांनी उज्ज्वल यश संपादन केले. याबद्दल कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी पुष्पगुच्छ देत डॉ. विशाल यांचे अभिनंदन केले. सर्वगोड यांच्या मातोश्री आणि पत्नीनेही डॉ. विशाल यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपअभियंता विनायक जोशी डॉ. विशाल यांचे वडील संदेश घाणेकर, शैलेश कांबळे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!