मित्राच्या आठवणींना जपत सामाजिक कार्य उल्लेखनीय – बंडू हर्णे
कणकवली (प्रतिनिधी) : गांगेश्वर मित्र मंडळ कणकवली आपल्या मित्रांच्या आठवणी जपत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे. मागील 14 वर्ष सातत्याने क्रिकेट स्पर्धा या मंडळाच्या माध्यमातून भरविल्या जातं आहेत. आतां नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा सुसज्ज अश्या मैदानावर होणार आहेत त्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या प्रयत्नातून निधी प्राप्त झाला असून लवकरच त्याचं भूमिपूजन होईल असा विश्वास माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांनी व्यक्त केला.
गांगेश्वर मित्रमंडळ पुरस्कृत चानी जाधव मित्रमंडळ आयोजित कै रणजित पाटील प्रीमियर लीग या नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे बोलत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री हडळ, माजी मगरसेवक शिशिर परुळेकर, भाजपा शहर अध्यक्ष आण्णा कोदे, माजी नगरसेवक अभय राणे, गौरव मुंज, चानी जाधव, गौरव हर्णे, गणेश तळगावकर, सिद्देश तळगावकर, योगेश ताम्हाणेकर, राकेश काणेकर, विनोद चव्हाण, सागर राणे, तेजस लोकरे, आनंद भानुशाली, राकेश काणेकर, अभि साटविलकर, जोगी राणे, योगेश चव्हाण, उमेश परब, योगेश जाधव, रोशन जाधव रुपी मोरे,विनय परब, विवेक परब, रोहीत जाधव, सचिन राठोड, सुरज कदम, यश परब आदीसह मंडळाचे कार्यकर्ते व खेळाडू उपस्थित होते.
चानी जाधव मित्रमंडळाच्या माध्यमातून कै रणजित पाटील व रोहीत गावडे यांच्या स्मरणार्थ कै रणजित पाटील प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 25 हजार 14 व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक 15 हजार व आकर्षक चषक तसेच इतर आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तीन रात्र चालनारी ही क्रिकेट स्पर्धा खवय्यांची स्पर्धा म्हणून देखील ओळखली जाते. या स्पर्धेत जिल्ह्यातील 16 संघ सहभागी झाले असून रविवारी या स्पर्धेचा अंतिम सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमीनी उपस्थित रहावे असे आवाहन गांगेश्वर मित्र मंडळ व चानी जाधव मित्रमंडळाच्या














