कोकण रेल्वे प्रवाशी संघटने चा आंदोलन छेडण्याचा इशारा
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी रेल्वेस्थानकात जलद एक्सप्रेस ला थांबा दयावा. तसेच तिकीट काउंटर सुरु करावा. यासह स्थानकातील विविध समस्यां एप्रिल पर्यंत पूर्ण झाल्या नाहीत तर मे महिन्यात आंदोलन छेडण्याचा इशारा कोकण रेल्वे प्रवाशी संघटना वैभववाडीच्यावतीने देण्यात आला आहे.
वैभववाडी शासकीय विश्रामगृहावर प्रवाशी संघटनेच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत मुद्रस बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष विठ्ठल मासये,किशोर जैतापकर,श्रीकृष्ण सोनार,एकनाथ दळवी,तेजस आंबरेकर,रत्नाकर कदम,आदी उपस्थित होते.अध्यक्ष श्री.मुद्रस म्हणाले कोरोनामध्ये बंद करण्यात आलेली वैभववाडी रेल्वे स्थानकातील आरक्षण प्रणाली आजमितीस बंदच आहे.इतर स्थानकातील ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे.असे असताना वैभववाडी स्थानकाला वेगळा न्याय का असा प्रश्न आहे.त्यामुळे तातडीने ही प्रणाली सुरू करावी,वैभववाडी स्थानकातुन वैभववाडी,गगनबावडा,देवगड,कणकवली,राजापुर तालुक्यातील काही असे प्रवाशी प्रवास करतात.त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील अनेक स्थानकांपेक्षा या स्थानकांमध्ये चांगले भारमान मिळते.त्यामुळे वैभववाडी रेल्वेस्थानकात नेत्रावती एक्सप्रेस,एलटीटी कोचुवेली एक्सप्रेस,तेजस एक्सप्रेस,एलटीटी मडगाव एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळावा,याशिवाय वैभववाडी रेल्वेस्थानकाचे सुशोभिकरण, पुल,निवारा शेड यासह विविध मागण्यां आम्ही रेल्वे प्रशासनाकडे केलेल्या आहेत.वर्षभरापासुन या मागण्यांसाठी आम्ही प्रशासनाशी पत्रव्यवहार करीत आहोत.परंतु रेल्वे प्रशासनाकडुन कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.लोकप्रतिनिधींना देखील आम्ही आमच्या मागण्यांचे निवेदन दिलेले आहे.रेल्वे प्रशासनाने यातील महत्वाच्या मागण्या एप्रिलपुर्वी पुर्ण कराव्यात अन्यथा मे महिन्यात आम्ही वैभववाडी रेल्वे स्थानकात लोकशाही पध्दतीने आंदोलन करू असा इशारा श्री.मुद्रस यांनी दिला आहे.