कणकवली बिजलीनगर येथील सुप्रिया पाटेकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : बिजलीनगर येथील रहिवासी सुप्रिया उर्फ अलका बाबुराव पाटेकर (६४) इथे शनिवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन विवाहित मुली, जावई, सून, दीर, भाऊजय ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर रविवारी दुपारी कणकवली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी बाबुराव पाटेकर यांच्या पत्नी होत.

error: Content is protected !!