शिवसेना शिंदे गट पक्षाच्या वतीने सुमारे ५ लाख रुपयांचा निधी मंजूर
खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून खारेपाटण जिजामाता नगर मधील अंतर्गत रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामासाठी सुमारे ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून नुकताच या कामाचा शुभारंभ शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
यावेळी शिवसेना कणकवली तालुका विधानसभा प्रमुख संदेश पटेल, उपतालूका प्रमुख मंगेश गुरव,खारेपाटण ग्रा.पं.सदस्य गुरुप्रसाद शिंदे,जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंगेश ब्रम्हदंडे, शहर प्रमुख सुहास राऊत,स्थानिक रहिवासी संतोष राऊत,कुबल गुरुजी, उन्हाळकर गुरुजी,किशोर माळवदे,तृप्ती पाटील,सुभाष गुरव,दत्ताराम गुरव,प्रशांत गाठे, सागर कांबळे,संदीप पाटील,यांसह गावकार सुरेश आप्पा गुरव, व शिवसैनिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिजामाता नगर खारेपाटण येथील राऊत सर यांचे घराकडे जाणारा रस्ता व रवी गोखले यांच्या घराकडे जाणारा रस्ता या दोन्ही रस्ता कामाचा शुभारंभ आज मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी स्थानिक रहिवासी व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी मंगेश गुरव यांनी खारेपाटण जिजामाता नगर विकास कामांसाठी भरीव विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार किरण उर्फ भैया सामंत,आमदार निलेश राणे यांसह वरिष्ठ सर्व नेत्यांचे आभार मानले.व शिवसेना सदैव जनतेसाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.















