खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण पोलीस दुरर्शेत्र अंतर्गत येणाऱ्या शिडवणे या गावात नुकताच सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने येथील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडी अडचणी समजून घेण्यात आल्या. यावेळी खारेपाटण पोलीस दूर शेत्राचे बीट पोलीस अंमलदार चंद्रकांत माने यांनी शिडवणे गावाला भेट दिली.तसेच येथील ज्येष्ठ महिला पुरुष नागरिकांशी संवाद साधला.व त्यांच्या संरक्षण बाबत पोलीस दल आपल्या सदैव पाठीशी असल्याचे सांगून त्यांना योग्य असे मोलाचे मार्गदर्शन केले.
सद्याच्या बदलत्या परस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असून कौटुंबिक त्रासाला कंटाळून निराशेचे जीवन जगावे लागत आहे. अशावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक घटकांसाठी भारतीय कायद्या नुसार त्यांचे असलेले हक्क आणि अधिकार याविषयी त्यांना सखोल माहिती पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली.यावेळी शिडवणे गावातील ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.











