वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाला देणगी स्वरूपात विविध वस्तू प्रदान; माजी विद्यार्थी राजू जठार यांचे सौजन्य

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला माजी विद्यार्थ्यांनी विविध वस्तू देणगी स्वरूपात दिल्या आहेत. या शाळेचे माजी विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ राजू जठार यांनी त्यांच्या मातोश्री स्व.चंद्रभागा दत्तात्रय जठार यांच्या स्मरणार्थ चप्पल स्टँड देणगी स्वरुपात दिले.

शाळेतील प्रत्येक वर्गाबाहेर चप्पल स्टँड असले पाहिजे, आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या वर्गाबाहेर चप्पल काढून व्यवस्थितपणे ठेवता यावी या भावनेतून हे लोखंडी स्टँड देणगी स्वरुपात विद्यालयाला देण्यात आले. याचे उद्घाटन नुकतेच तळेरे येथील स्व.सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत वरुणकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी डॉ. बाळकृष्ण लळीत, डॉ. प्रकाश बावधनकर, शाळा समिती चेअरमन अरविंद महाडिक, डॉ.चित्रा ठाकूर, राधा कडुसकर, घनश्याम कडूसकर, शारदा भस्मे, विजय भस्मे, कश्मिरा महाडीक, प्रेषित महाडीक, संदीप कोळेकर, दिलीप तळेकर, प्राचार्य अविनाश मांजरेकर, देणगीदार राजू जठार, सूर्यकांत तळेकर, चंद्रकांत तळेकर, प्रवीण वरुणकर आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम प्रशालेच्या एम.डी.देसाई सांस्कृतिक भवनमध्ये नुकताच पार पडला.

प्रशालेतील भौतिक सुविधा अनेकांच्या सहकाऱ्याने पूर्णत्वास केल्या जात आहेत. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे माजी विद्यार्थ्याकडून मिळणाऱ्या सहकार्यातून शाळेची बरीचशी कामे मार्गी लागत आहेत. याचाच विचार करून प्रत्येक वर्गातील मुलांच्या चप्पला व्यवस्थित राहाव्यात, शिवाय मुलांना शिस्त लागावी आणि वर्गात साफसफाई रहावी हे लक्षात घेऊन प्रत्येक वर्गासमोर असे चप्पल स्टँड असावे ही विद्यालयाची गरज ओळखून लोखंडी चप्पल स्टॅण्डची पूर्तता राजू जठार यांनी पूर्ण केली. या देणगी बद्दल विद्यालयाचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी राजू जठार यांचे अभिनंदन केले.‌

error: Content is protected !!