मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील किल्ले रामगडवर सोमवार दि. 24 मार्च 2025 रोजी दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने श्रमदान मोहीम आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला गडदेवता श्री गणेश तसेच शस्त्रपूजन करून मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी गडाचा झेंडा बुरुज ते होळीचा दरवाजापर्यंतची बाहेरील बाजूची तटबंदी तसेच गणेश मंदिर परिसर यांची साफसफाई करण्यात आली.
या मोहिमेमध्ये दुर्गवीरचे मिलिंद चव्हाण, शुभम घाडी, सुबोध चव्हाण, विनय घाडीगांवकर, प्रणय चव्हाण, साहिल नाटेकर आदी सदस्य उपस्थित होते.












