फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट परिसरात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटा सह धुवांधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लाईट गायब झाली अन वीज वितरण चे पितळ उघडे पडले.
अगोदरच निसर्गाच्या लहरीपणा मुळे अत्यल्प पीक असलेल्या आंबा व काजू बागायतदार चिंतेत पडले. जोरदार वेगाचे वादळ आणि वारा यामुळे झाडाखाली आंब्याचा खच पडला — बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले.. तालुका कृषी विभागाने या नुकसानीची विमा कंपनीला नोंद पाठवावी असे आवाहन बागायतदारांकडून होत आहे.
हवेत गारवा आला असला तरी झालेल्या नुकसान मुळे बागायतदार चिंतेत पडले आहेत..












