ट्रकची रिक्षाला जोरदार धडक : एकजण गंभीर जखमी

एडगांव घाडीवाडी येथे घडला अपघात

वैभववाडी (प्रतिनिधी) : भरधाव येणाऱ्या ट्रकची रिक्षाला जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक गणपत काशीराम धावडे वय 58 रा. करुळ भोयडेवाडी हे गंभीर जखमी झाले आहेत. तर संतोष रामकृष्ण माळकर वय 48 या. करुळ हे किरकोळ जखमी झाला आहेत. ही घटना तरेळे – कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर एडगांव घाडीवाडी नजीक सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींना ओरोस येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी वैभववाडी पोलीस दाखल होत अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे.

वैभववाडीहून करुळकडे रिक्षा घेऊन चालक गणपत धावडे जात होते. कोल्हापूरहून वैभववाडीच्या दिशेने भरधाव वेगाने येणा-या ट्रकने या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत धावडे व रिक्षात बसलेले माळकर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी दोघांनाही वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांनाही तात्काळ ओरोसकडे हलविण्यात आले आहे. तरेळे – गगनबावडा या मार्गाचे सद्यस्थितीत रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे. काही ठिकाणी रस्ता काम पूर्ण झाले आहे. काँक्रीटच्या रस्त्यावरून भरधाव वेगाने चालवली जात आहेत. त्यामुळेच अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या अपघाताचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!