बिळवस हायस्कुल येथे तेजस्वी चव्हाणचा सन्मान !

मसूरे (प्रतिनिधी) : आंगणेवाडीची सुकन्या तेजस्वी बाबुराव चव्हाण हिने सिव्हिल इंजिनअरिंगचे मास्टर्स डिग्रीचे शिक्षण इंग्लंड येथे नुकतेच पूर्ण केले. कु. तेजस्वी ही माध्यमिक विद्यालय बिळवसची माजी विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशाबद्दल बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत जगन्नाथ पालव यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तिचा प्रशालेत सत्कार केला. तसेच आंगणेवाडीतील जेष्ठ ग्रामस्थ सिताराम शांताराम आंगणे यांनी तिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तेजस्वी बाबुराव चव्हाण हिने १ ली ते ५ वीचे शिक्षण आंगणेवाडी प्राथमिक शाळा, ५ वी ते ७ वी बिळवस हायस्कूल मधून तर ९ वी आणि १० वी टोपीवाला हायस्कूल मधून पूर्ण केले. त्यानंतर डिप्लोमा सिव्हिल इंजीनियरिंग हे पॉलिटेक्निक मालवण आणि सिव्हिल इंजिनीयरिंग डिग्री भारती विद्यापीठ पुणे मधून प्राप्त केली आहे. खडतर अशी मास्टर्स डिग्री (construction cost management) युनिव्हर्सिटी ऑफ रिडींग इंग्लंड मधून प्राप्त केली आहे. संस्था अध्यक्ष सूर्यकांत पालव यांनी अभिनंदन करताना तेजस्वि चव्हाण हिचा आदर्श सर्व विध्यार्थ्यानी घ्यावा असे आवाहन केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना तेजस्वी म्हणाली, देशाबाहेर जाऊन शिक्षण घेताना तुमच्या शिक्षणाचे माध्यम कधीच अडचण होत नाही. आपण शिकण्याची इच्छा ठेवली की आपण यशस्वी होतो. यावेळी उधोजक बाबुराव चव्हाण, प्रशालेचे मुख्याध्यापक जयवंत ठाकूर, शिक्षकवर्ग, संस्थेचे सरचिटणीस अशोक जनार्दन पालव, सल्लागार प्रभाकर रघुनाथ पालव, सदस्य राजेंद्र रामचंद्र पालव, सुरेश राजाराम पालव व मधुकर गणेश आंगणे उपस्थित होते.

error: Content is protected !!