सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवी गायक नाथा जाधव व जनिकुमार कांबळे यांना

सम्यक कोकण कला संस्थेचा ‘कोकण रत्न’ पुरस्कार जाहीर

खारेपाटण (प्रतिनिधी) : बहुजन हितवर्धक कला संस्था महाराष्ट्र (रजि.)मुंबई पुरस्कृत सम्यक कोकण कला संस्था रजि.या संस्थेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण रत्न पुरस्कार – २०२५ जाहीर करण्यात आले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुद्ध,फुले,शाहू, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा प्रसिद्ध कवी गायक श्री नाथा जाधव (वारगावकर) व जनिकुमार कांबळे या दोघांना जाहीर झाला असून या दोन्ही पुरस्कार प्राप्त महनीय व्यक्तीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

मराष्ट्रातील आणीं विशेष करून कोकणातील तळागाळातील नवीन कलावंतांना तसेच कार्यकर्त्यांना प्रोत्साहन व संधी निर्माण करून देणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या सम्यक कोकण कला संस्थेच्या वतीने दी.६ एप्रिल २०२५ दु.३.०० ते रात्री.९.३० या वेळात बौध्दजन पंचायत समिती हॉल परेल,मुंबई येथे या कोकण रत्न पुरस्काराचे वितरण बौद्धजन पंचायत समितीचे सभापती सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

कोकणरत्न मंगेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाला दै.सार्वभौम राष्ट्राचे संपादक प्रेमरत्न चोकेकर साहेब,साहित्यिक कोकण रत्न रश्ट्रपाल सावंत सर आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवी गायक नाथा जाधव व जनिकुमार कांबळे यांना या संस्थेचा प्रथमच कोकण रत्न पुरस्कार जाहीर झाला असून शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ,सन्मान पत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

error: Content is protected !!