नवीन कुर्ली ग्रामपंचायत चा कोण होणार पहिला सरपंच ?

662 मतदार ठरवणार पहिला सरपंच

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नव्याने स्थापन झालेल्या नवीन कुर्ली वसाहत ग्रामपंचायत ची निवडणूक काही दिवसांत होणार असून एकूण 662 मतदार गावचा पहिला सरपंच कोण होणार हे ठरवणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कणकवली यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतच्या रिक्त सदस्य जागी पोटनिवडणूक आणि नवीन कुर्ली ग्रामपंचायतच्या मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. नव्याने स्थापन झालेल्या आणि पहिल्यांदाच निवडणूक होत असलेल्या नवीन कुर्ली ग्रामपंचायत साठी एकूण 662 मतदारांची यादी प्रसिद्ध झाली. यावर घेतलेल्या हरकतींची सुनावणी झाली असून ज्या मतदारांचा प्रभाग बदलला असेल त्या हरकतीवरील निर्णय झाले असून 26 मार्च रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  नवीन कुर्ली ग्रामपंचायत साठी  एकुण 3 प्रभागात निवडणूक होणार आहे. 3 प्रभागातून एकूण 7 सदस्य निवडून येणार असून सरपंच निवडण्यात येणार आहे. प्रभाग 1 मध्ये पुरुष मतदारसंख्या 136 असून महिला मतदार 145 आहेत. प्रभाग दोन मध्ये पुरुष मतदारसंख्या 100 तर महिला मतदार 99 आहेत. प्रभाग 3 मध्ये पुरुष मतदारसंख्या 76 आणि महिला मतदारसंख्या 82 आहे. प्रथमच सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यपदासाठी होणाऱ्या नवीन कुर्ली ग्रामपंचायत च्या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस एस पी चे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर आणि भाजपाचे प्रशांत दळवी व दळवी यांचे सहकारी ग्रामपंचायत मध्ये वर्चस्व राखण्यासाठी कसून मेहनत घेणार असून, यात बाजी कोण मारतो हे निवडणूक जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल.

error: Content is protected !!