सिद्धेश चव्हाण याची सर्वोत्कृष्ट सिनेमॅटिक रिल्स !
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे प्रदान !
कणकवली (प्रतिनिधी) : शिमगोत्सवानिमित्त कै. सुरेश धडाम यांच्या स्मरणार्थ महापुरुष मित्रमंडळाच्यावतीने झेंडा चौक येथील मांडावर आयोजित केलेल्या राधानृत्य रोंबाट स्पर्धेत मोरेश्वर महाडेश्वर मित्रमंडळ, नेरूळ – वाघाचौडीने प्रथम क्रमांक मिळवला. सिनेमॅटिक रिल्स स्पर्धेत सिद्धेश चव्हाण (डार्क स्नॅप स्टुडिओ) याने प्रथम क्रमांक मिळवला.
राधानृत्य रोंबाट स्पर्धेत श्री देव गावडेबाक्कलेश्वर मित्रमंडळ,राईवाडीने द्वितीय तर श्री देव गावडोबा मित्रमंडळ, कुडाळ-माड्याचीवाडी तृतीय क्रमांक पटकाविला. उत्तेजनार्थचे प्रथम पारितोषिक सिद्धिविनायक तेंडोली तळेवाडी, द्वितीय ठाकूरवाडी आदिवासी म्युझियम पिंगुळी, तृतीय कल्याण पुरुष तेंडोली तृतीय प्राप्त केला. या स्पर्धेत ८ संघांनी सहभाग घेतला होता. संघांनी विविध नृत्य व कलाविष्कार सादर करून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सिनेमॅटिक रिल्स स्पर्धेत रोहित कडू (रोहित मालवणी) याने द्वितीय तर निखिल नाईक (कणकवलीचा निखिल) याने तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिक एस.डब्ल्यू.एडिट ब्लॉक्सला मिळाले. रिल्स स्पर्धेत १० जणांनी सहभाग घेतला होता.
राधा नृत्य रोबाट स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम रुपेश नेवगी व प्रसाद राणे यांनी केले. सिनेमॅटिक रिल्स स्पर्धेचे परीक्षक म्हणून रुद्र सापळे यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरणावेळी प्रसाद अंधारी, नीलेश धडाम, मंदार सापळे, दादा नार्वेकर राजू मानकर, लिलाधर गोवेकर, काशिनाथ कसालकर, बाळा सापळे, सुशील पारकर, बाळा मेनकुदळे, किशोर अंधारी, रमेश काळसेकर, उमेश वाळके, शशिकांत कसालकर, राजू बजाजी, चेतन अंधारी,प्रद्युम मुंज, हरिष उचले, हर्षल अंधारी,संदीप अंधारी, चेतन मुंज, धोंडी वाळके,विकास कानेकर, प्रज्वल वर्दम, सोहम वाळके, सूरज ओरसकर,वृषभ मेनकुदळे, रोशन मांगले, नाना सापळे,प्रसन्ना देसाई यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्याने महापुरुष मित्रमंडळाने शिमगोत्सवाचे औचित्यसाधून सिनेमॅटिक रिल्स स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत रिल्स स्पर्धकांनी सहभाग घेत कोकणातील शिमगोत्सवातील परंपरा व कला या जागराचा स्पर्धेच्या माध्यमातून प्रचार व प्रसार केला.
लोककलांचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश
राधानृत्य रोंबाट स्पर्धेत ठाकूरवाडी आदिवासी म्युझियम पिंगुळी संघाने ठाकर समाजातील कला व परंपरांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. यामाध्यमातून त्यांनी नव्या पिढीला लोककलांचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश दिला. तसेच लोककला सादरीकरणावेळी वापरण्यात येणाऱ्या वाद्यांची माहिती दिली. लोककला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल या संघाने महापुरुष मित्रमंडळाचे आभार मानले.














