कोईळ शाळेचे नवोदय परीक्षेत सुयश !

मसुरे (प्रतिनिधी) : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोईळ येथील स्वराज धोंडी कदम याने नेत्रदीपक यश संपादित करून नवोदय विद्यालयासाठी प्रवेश मिळवला आहे. स्पर्धात्मक परीक्षेत मिळवलेले हे यश त्याच्या जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचा विजय असुन त्याने आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. स्वराज ने कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असे आहे. त्याला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मुख्याध्यापक वर्षाराणी सुरवसे आणि गणेश सुरवसे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल बांदिवडे केंद्राचे केंद्रप्रमुख नारायण देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश साटम यांनीही स्वराज कदम याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!