रामनामाचा परिसस्पर्श व्हावा | श्रीराम हृदयी वसावा | जगणे राम- कृष्ण – हरी व्हावे | ऐसे रामराज्य यावे, अभंगातून सर्वांच्या अपेक्षा!

किर्तनाच्या अभंगात आणि जय श्रीराम च्या जयघोषात, फोंडाघाट विठ्ठल मंदिरात रामनवमी जल्लोष जल्लोषात !

पंचक्रोशीतील अबाल- वृद्धही स्त्री पुरुषहा युवाईची मांदियाळी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेल्या सुमारे पाच पिढ्यांपासून चालत आलेल्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या, फोंडाघाट – मारुती वाडी येथील विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात, राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाला. पहाटेपासूनच विद्युत रोषणाई अन फुलांच्या मोहक सजावटीसह, श्रीरामाच्या भक्ती स्वरांनी आसमंत चैतन्यमय झाला होता. ह. भ. प. बापू महाराज सामंत यांचे सहकारी- वारकरी संप्रदायातर्फे वारकरी अभंगांनी वातावरण भारून गेले होते. ठीक बारा वाजता शितोळे परिवारातील दीपक, प्रकाश, शशिकला, सोन्या, वर्षा यांचे उपस्थितीत आणि भाई हिर्लेकर उभयतांच्या पौरोहित्याखाली, राम जन्मोत्सव जय श्रीरामाच्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या पारंपारिक गजरात जल्लोषात संपन्न झाला.

यावेळी उपस्थितानी चाफ्याच्या फुलांचा वर्षाव प्रतिनिधीक रामावर केला. उपस्थितांनी अन वारकऱ्यांनी आपल्या अभंगातून यावेळी रामजन्माचा परिसर स्वर्ग व्हावा | श्री राम हृदयी वसावा | जगणे राम- कृष्ण- हरी व्हावे | असे रामराज्य यावे | अशा अपेक्षा व्यक्त केल्या. त्यानंतर भाई हिर्लेकर यांनी पाळण्यामध्ये स्थापित केल्यावर,सुहासिनी आणि प्रकाश शितोळे यांनी श्रीरामाला पाळणा गाऊन जोजविले. यावेळी श्रीराम व श्री हनुमानाची सवाद्य भेट लक्षणीय ठरली. त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा आणि स्थानिक भजने तसेच हरीपाठाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.. या कार्यक्रमांना पंचक्रोशीतील अबाल वृद्ध स्त्री- पुरुष- युवाई मोठ्या संख्येने उपस्थित होती.

error: Content is protected !!